घोड्यावर स्वार होऊन शिवजंयती निमित्त खास शुभेच्छा देतेय भाग्यश्री न्हालवे

By  
on  

वेबसिरीज असो किंवा मालिका प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आपल्या सहज सुंदर अभिनयाने रसिकांवर गारुड करणारी अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे हिने आज शिवजयंतीनिमित्त रसिकांना आपल्या सोशल मिडीयावरुन शुभेच्छा दिल्या आहेत. पण फक्त शुभेच्छाच नाहीतर एक खास फोटोशूट करुन तिने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. नऊवारी साडी, मराठमोळा साज आणि  डोक्यावर फेटा अशा अंदाजात रूबाबदारपणे ती घोडेस्वारी करताना पाहायला मिळतेय. 

भाग्यश्रीच्या या घोड्यावर स्वार होऊन केलेल्या फोटोशूटचीच सध्या सर्वत्र चर्चा आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षावच सुरु केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सौ. सूर्याजी मालुसरे. . . . यांना भेटूया लवकरच येत्या 10 जानेवारी ला, 'Tanhaji - The unsung warriors', या चित्रपटात (Ajay devgan productions). @tanhajifilm @omraut @kajol @ajaydevgn . . . Beautiful capture by my brother @red_pixel_studio Designer my lovely sister @designer5586 . . . . #bollywood #movie #film #bhagyashreenh #bhagyashreenhalve #saswad #newshoot #capture #marathimotivational #marathimulagi #marathigirls #marathigirl #pune #mumbai #marathi #marathistars #maratha #marathmoli #happy #smile #smilyface #natural #beauty #love #actress #actresslife #AjayDevgnFFilms

A post shared by Bhagyashree Nh (@bhagyashreenh) on

अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ हा ऐतिहासिकपट अलिकडेच प्रदर्शित झाला. अजय देवगण आणि काजोलसोबतच यात काही मराठी कलाकारही झळकले आहेत. या कलाकारांमध्ये अभिनेत्री भाग्यश्री न्हालवेचादेखील समावेश आहे. तिने सूर्याजी मालुसरेंच्या पत्नींची भूमिका साकारली. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने सूर्याजी मालुसरे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. 

 कुंकू, टिकली आणि टॅटू ही मालिका व 'स्त्रीलिंग पुल्लिंग' या मराठी वेबसीरिजमध्ये झळकलेल्या भाग्यश्रीने आज स्वत:ची वेगळी छाप  सिनेसृष्टीत पाडली आहे. 

 

Recommended

Loading...
Share