By  
on  

रितेश देशमुखच्या ‘माऊली’चा उलगडला लय भारी टिझर

आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी आणि बहुप्रतिक्षित ‘माऊली’ सिनेमाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. लय भारी सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर या सिनेमातील माऊली या व्यक्तिरेखेवर हा आगामी सिनेमा आहे. पण हा या सिनेमाचा सिक्वल नाहीय. फक्त व्यक्तिरेखेवर आधारित असलेला हा सिनेमा एका वेगळ्या कथानकावर आधारित आहे. महत्त्वाचं म्हणजे या टिझरमधून रितेश हा पंढरपूरातल्या एका डॅशिग पोलिसाच्या अवतारात पाहायला मिळतोय. त्यामुळेच गुंडाराज किंवा भ्रष्टाचाराशी दोन हात करणा-या एका प्रामाणिक पोलिसाची कथा सिनेमात पाहायला मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

https://twitter.com/Riteishd/status/1060446174476406784

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर रितेशने ‘माऊली’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती, पण आता बॉलिवूड किंग आणि मित्र शाहरुख खानच्या सिनेमासाठी मनाचा मोठेपणा दाखवत आपला सिनेमा एक आठवड्यापूर्वीच प्रदर्शित करण्याचं रितेशने ठरवलं आहे.

मुंबई फिल्म कंपनी ही हिंदुस्तान टॉकीजच्या सहयोगाने या सिनेमाची प्रस्तुती करत असून रितेशची पत्नी जेनेलिया देशमुख या सिनेमाची निर्माती आहे. आदित्य सरपोतदार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत असून सिनेमात रितेशबरोबर अभिनेत्री सैयामी खेर झळकणार आहे.

अजय-अतुल या सुपरहिट जोडीच्या संगीताने सजलेला रितेश देशमुखचा ‘माऊली’ येत्या 14 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

https://youtu.be/CAOvTG3DANI

Author

Recommended

PeepingMoon Exclusive