अभिनेत्री मयुरी देशमुखचा हा मराठमोळा साज एकदा पाहाच

By  
on  

खुलता कळी खुलेना या मालिकेतून रसिकांची लाडकी बनलेली अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने सर्वांचीच मनं जिंकली. नुकतंच मैत्रिणीच्या लग्नात मिरवताना मयुरी खुपच सुंदर दिसली. यावेळी तिने खास मराठमोळा साज केला होता. 

 

पिवळ्या रंगाच्या साडीत मयुरीच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

 

 

मैत्रिणीच्या लग्नात मयुरी करवली म्हणून खुप छान मिरवत होती. मयुरीचा हा मराठमोळा अंदाज पाहून चाहत्यांनी तिच्या फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 

 

 

नाटक ,सिनेमा आणि मालिका अशा तिनही माध्यमात मयुरीने काम केलंय, तिच्या आगामी प्रोजेक्टसची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

Recommended

Loading...
Share