अभिनेता स्वप्निल जोशी म्हणतोय,'मी पण सचिन'

By  
on  

अभिनेता स्वप्निल जोशीचे चाहते त्याच्या सिनेमाची अगदी आतुरतेने वाट पाहात असतात. लवकरच त्याचा सुपरहिट मुंबई-पुमे मुंबई सिनेमाचा तिसरा सिक्वल येतोय. मराठी सिनेसृष्टीतल्या या चॉकलेट बॉयला नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळते. आता एका आगळ्या-वेगळ्या विषयासह स्वप्निल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

आज पाडव्याच्या मुहूर्तावर स्वप्निल जोशीने आपला आगामी सिनेमा 'मी पण सचिन' या सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवर उलगडलं आहे.

https://www.instagram.com/p/Bp56UzAgyeN/

या सिनेमात स्वप्निल प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याची शक्यता असून स्वप्निलने त्याच्या भूमिकेविषयी कोणताही खुलासा अद्याप  केलेला नाही. क्रिकेट आणि या खेळात अव्वल होण्याचं स्वप्न बाळगणा-या मुलावर हा सिनेमा आधारित असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

‘मी पण सचिन’ हा सिनेमा १ फेब्रुवारी २०१९ ला प्रदर्शित होणार असून श्रेयस जाधवने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे तर गणराज असोशिएटसने सिनेमाची प्रस्तुती ेकली आहे.

सर्वांनाच आता स्वप्निलच्या 'मी पण सचिन' या सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे.

Recommended

Loading...
Share