By  
on  

 ‘अश्लिल उद्योग मित्र मंडळ’च्या निमित्ताने पर्ण पेठेचं हे स्वप्न झालं पूर्ण 

नाटक आणि सिनेमांमधून वैविध्यपूर्म काम करणारी तरुण अभिनेत्री पर्ण पेठे सध्या तिच्या आगामी सिनेमामुळे लक्ष वेधतेय. ‘अश्लिल उद्योग मित्र मंडळ’ हा सिनेमा आणि या सिनेमातील तिची भूमिका चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय.

पर्ण पेठेसाठी हा सिनेमा खास ठरतोय. या सिनेमाच्या निमित्ताने पर्णचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झाल्याची माहिती पर्णने पिपींगमून मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगीतली. पर्ण म्हटली की, “आलोकने अनेक प्रायोगीक नाटकं याआधी दिग्दर्शित केली आहेत. आम्ही दोघांनी अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केलं आहे सिनेमांमध्येही एकत्र काम केलं आहे. पण तो दिग्दर्शक आणि मी अभिनेत्री असं आम्ही कधीच काम केलं नव्हतं. तर यानिमित्ताने असं म्हणता येईल की माझं हे स्वप्न पूर्ण झालं. तो एक संवेदनशील दिग्दर्शक आहे. ज्या पद्धतिने तो गोष्टी बघतो, तो ज्या पद्धतिने विचार करतो ते कायमच आश्चर्यकारक असतं. या सिनेमात त्याने माझ्याकडून खूप चांगलं काम करून घेतलं आहे. अनेक वर्षांचं स्वप्न या निमित्ताने पूर्ण झालय. पण हे सोपं नव्हत कारण एक मित्र असणं, नवरा असणं याच्यापलिकडे दिग्दर्शक आणि अभिनेत्री हे खुप अवघड कॉम्बिनेशन आहे पण मला आनंद आहे की आम्ही दोघांनी हा सिनेमा एकत्र केला.”


पर्णचं हे स्वप्न तर पूर्ण झालय शिवाय पर्ण या सिनेमातून तिची बबली इमेज तोडण्याचा प्रयत्न करतेय. याविषयी ती सांगते की, “ माझी एक इमेज आहे की ही एक गोड बबली मुलगी आहे. माझे येणारे ‘मिडीयम स्पायसी’ आणि ‘अश्लिल उद्योग’ या दोन्ही सिनेमांमध्ये वेगळ्या भूमिका आहेत. दोन्ही सिनेमांचे दिग्दर्शक प्रायोगीक नाटकांचे दिग्दर्शक आहेत ज्यांच्यासोबत मी पहिल्यांदा काम करत आहेत. यात मी बोल्ड नाही पण नेहमीच्या गोड मुलीच्या पात्रापेक्षा आत्ताच्या काळातील जशा मुली आहेत त्यांच्यासमोरचे जे प्रश्न आहेत ते विचारणारी ही मुलगी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने माझं वेगळं काम पाहायला मिळणार आहे.” 


 एकूणच या सिनेमाच्या निमित्ताने एक वेगळी पर्ण पडद्यावर अनुभवायला मिळेल. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या सिनेमात पर्ण पेठे, अभय महाजन, सई ताम्हणकर, सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके अशी स्टारकास्ट झळकणार आहे. येत्या 6 मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 
 

Recommended

PeepingMoon Exclusive