ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं शुक्रवारी पहाटे पुणे येथे वृद्धापकाळामुळे निधन झालं. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. सामना, हा खेळ सावल्यांचा, महेक अशा सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. सखाराम बाईंडर, रथचक्र, कमला, गिधाडे या नाटकांमधील त्यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या.
कणकवली येथे झालेल्या ८७व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या निधनामुळे कला विश्वात शोककळा पसरलीय.
अभिनयापासून सुरू झालेला lत्यांचा प्रवास लेखिका, एकपात्री कार्यक्रम सादरकर्त्यां ते व्यावासायिक, उद्योजिका , निर्माती असा झाला.