शुभलग्न फेम अभिनेता प्रतिक देशमुखने आपल्या कुटुंबियांसोबत USA येथे दिवाळी साजरी केली. सुट्टीचा मनोसोक्त आनंद घेताना तो यावेळी पाहायला मिळाल.
मुळचा पूण्याचा असलेला प्रतिक गेली काही वर्ष अमेरिकेमध्ये स्थायिक होता. पण अभिनयाचे वेड त्याला अमेरिकेत स्वस्थ बसू देईना. अभिनयात रस असूनही शिक्षण पूर्ण करून वॉशिंग्टन डिसीमध्ये सॅटेलाइट इंजिनीअरची नोकरी त्याने केली पण लहानपणापासून असलेले अभिनयाचे वेड त्याला परत मायदेशी घेऊन आले.
अमेरिकेत निवांत वेळ तो आपलं आवडतं पुस्तक वाचण्यात मजेत घालवतो.
प्रतिकने शुभलग्न सिनेमाद्वारे पदार्पण करण्याअगोदर अनुपम खेर ह्यांच्या अॅक्टर प्रिपेअर्समधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. एवढेच नाही तर ‘विशेष फिल्म्स’मध्ये सिनेमा आणि वेबसीरिजसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचेही काम केले आहे. सर्वसाधारणपणे बॉलीवूडमध्ये एन्ट्री केल्यावर हिंदी सिने-टेलिव्हिजनसृष्टीतच डेब्यू करणे अभिनेते पसंत करतात. पण प्रतिकने मराठी सिनेसृष्टीतून अभिनयात पदार्पण करणं पसंत केले आहे.