By  
on  

रितेश देशमुखला बनवायचा आहे वडील विलासराव देशमुख यांच्या आयुष्यावर सिनेमा

अभिनेता रितेश देशमुखला वडील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बायोपिक बनवायचा आहे. तो एका अशा स्क्रिप्टच्या शोधात आहे जी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबतच त्यांचा प्रवास समोर आणेल. रितेश म्हणतो, ‘चमत्कारिक म्हणावा असाच त्यांचा प्रवास आहे. त्यांनी सरपंचपदापासून राजनैतिक करीअरची सुरुवात केली. त्याचा हा प्रवास त्यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत घेऊन गेला. अनेक लोक माझ्याकडे त्यांच्या बायोपिकची स्क्रिप्ट घेऊन येतात. पण हे दिसतं इतकं सोपं नाही.

यापुढे तो म्हणतो, ‘सिनेमाचा विषय मनाच्या जवळचा असेल तर अनेकदा पटकथेचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. जर मी सिनेमा बनवला तर केवळ त्यांच्याविषयी चांगल्या गोष्टी पडद्यावर दिसतील. किंवा इतर कुणी सिनेमा बनवला तर अनेक बाबी मला खटकू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचे सिनेमे बनवताना विशेष काळजी घ्यायला हवी.’ 

तो पुढे म्हणतो, तुम्ही एखाद्या व्यक्तीचं जीवनचरित्र लिहिताना 500-600 पानांचं पुस्तक लिहू शकतो. पण सिनेमा बनवताना 2 तासात सगळा पट मांडावा लागतो. पण अनेकदा असा बायोपिक बोअरिंग होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणं महत्त्वाचं आहे. रितेशने बागी 3 सिनेमाच्या प्रमोशनवेळी या भावना व्यक्त केल्या.

Recommended

PeepingMoon Exclusive