By  
on  

हा आहे 'फाईट' सिनेमाचा अॅक्शनपॅक टिझर

बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये अॅक्शन नेहमीच पाहायला मिळते पण आता मराठीत देखील असाच एक अॅक्शनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.,फ्युचर एक्स प्रोडक्शन निर्मित आगामी 'फाईट' या चित्रपटाद्वारे सिनेरसिकांना जबरदस्त अॅक्शनपट पहायला मिळणार आहे. जिमी मोरे दिग्दर्शित 'फाईट' चित्रपटाचा नुकताच सोशल नेटवर्किंग साईट वर टिझर जर प्रदर्शित करण्यात आला. असून या टिझरमध्ये आपल्या जबरदस्त फाईट दृश्यांसोबत जीत आणि सायली जोशी हे नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. तसेच या चित्रपटामधील अनेक दृश्यांसाठी खूप मेहनत घेण्यात आली आहे, हे सुद्धा या टिझरमधून दिसून येते.

अॅक्शनचा जबरदस्त तडका असलेल्या या सिनेमात एक नवा चेहरा आपल्याला पाहायला मिळतो. मराठी सिनेसृष्टीत दमदार पदार्पण करणाऱ्या या जिगरबाज तरुणाचे नाव जीत आहे. विशेष म्हणजे, छोट्या शहरातून आलेल्या या तरुणाने ‘फाईट’ सिनेमातील अॅक्शन सीनसाठी भरपूर मेहनत घेतली असल्याचे  पाहायला मिळते. ‘फाईट’ या चित्रपटाचे ललित ओसवाल निर्माते आहेत. मराठीच्या मोठ्या पडद्यावरील ही ‘फाईट’ पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक असतील हे निश्चित !

https://youtu.be/8Og5b2wxW4M

Author

Recommended

PeepingMoon Exclusive