By  
on  

OMG! समर आणि सुमीचं रुप इतकं कसं पालटलं?

'ए पायलट...काय चाललंय, तुला आणखी काय हवंय का' अशी हाक फक्त आपली सुमीचं नव-याला म्हणजे समरला मारु शकते. तिचा सारा थाटच न्यारा आहे. पण हे फोटो पाहा ना... समर आणि सुमीचं रुपच पालटलेलं पाहायला मिळतंय. अगदी ऋषी-मुनींच्या  काळातील दोघांचं हे पौराणिक रुप सर्वांनाच नक्की आवडेल यात शंका नाही. 

समर आणि सुमी या नव्या रुपात फारच गोड दिसतायत. आता या पौराणिक रुपात समरला काय नवीन नाव ठेवायचं असा मोठा गहन प्रश्न सुमीला पडलाय... तुम्हाला जर ते आठवत असेल तर तुम्हीसुध्दा सुमीला ते नक्की सुचवू शकता. 
'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतल्या एका सिक्वेन्ससाठी या जोडीने ही खास वेषभूषा केल्याचं दिसतंय. त्यानुळे हा विशेष भाग पाहण्याची आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

मुख्यंमत्री होण्याचं स्वप्न पाहून जनहितासाठी धडपडणारा समर आणि प्रत्येक कठीण प्रसंगात त्याच्या पाठीमागे त्याला खंबीर साथ देणारी सुमी ह्यांची ही छोट्या पडद्यावरची कहाणी अल्पावधीतच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.  प्रमुख भूमिका साकारणारे अमृता धोंडगे आणि तेजस बर्वे  ही जोडी सर्वांचीच लाडकी आहे. अलिकडेच या मालिकेचे  200 भाग पूर्ण झाले होते व या यशाचा आनंद संपूर्ण टीमने जल्लोषात साजरा केला. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive