By  
on  

'ही दोस्ती तुटायची नाय', चाहत्यांना पाहायचंय ह्या दोघांना सिनेमात एकत्र

हा फोटो पाहून वडिलांप्रमाणेच  यांचीसुध्दा 'ही दोस्ती तुटायची नाय' असंच म्हणावं लागेल. मराठी सिनेसृष्टीचं अविरत मनोरंजन करुन 80-90 चा काळ धूमधडाक्यात गाजवणारी जोडी म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे. या जोडीसारखीच त्यांची मुलं अभिनय बेर्डे व आदिनाथ कोठारे. हे दोघंही एकमेकांचे खुप घनिष्ट मित्र आहेत. इतकंच नाही तर  ते एकत्र वर्कआऊटसुध्दा करतात. अभिनयनेच आदिनाथ सोबतचा जीममधील एक फोटो नुकताच शेअर केला आहे.आम्ही सख्खे भाऊच आहोत असं अभिनयला या फोटोतून सांगायचं आहे. 

अभिनय बेर्डे व आदिनाथ कोठारे नेहमी एकमेकांसोबत पाहायला मिळतात. एखाद्या मोठ्या भावाप्रमाणेच आदिनाथ हा अभिनयची काळजी घेतो,त्याला मार्गदर्शन करतो. आदिनाथ-अभिनय सिनेमात एकत्र कधी दिसणार अशा कॉमेंटसचा चाहत्यांनी वर्षाव सुरु केला आहे. 

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेचा रवी जाधव दिग्दर्शित ‘रंपाट’हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला होता. ती सध्या काय करते या सिनेमाद्वारे त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर सचिन पिळगावकर दिग्दर्शित अशी ही आशिकी प्रदर्शित झाला होता. 

तर आदिनाथबदद्ल बोलायचं झालं तर आदिनाथ लवकरच बॉलिवूड पदार्पण करतोय. रणवीर सिंह स्टारर '83 द फिल्म'मध्ये तो क्रिकेटपटू दिलीप वेंगसकरांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारतोय. तर माधुरी दीक्षितच्या आगामी 'पंचक' सिनेमातही तो झळकतोय. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आदिनाथचं दिग्दर्शन आणि अभिनय असलेल्या व प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या 'पाणी' सिनेमाला अनेक राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय सिनेमांनी गौरविण्यात आले. 

आता या दोन गुणी कलाकारांच्या गुणी मुलांना सिनेमात एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. त्यामुळे आदिनाथ व अभिनय लवकरच सिनेमात एकत्र पाहायला मिळतील अशी आशा करुयात.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive