सुख म्हणजे नक्की काय असतं..... येतेय ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’

By  
on  

अभिनेता प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता मेढेकर यांनी रंगवलेले मन्या-मनी या सुखी जोडप्याची पुढची गोष्ट आता अनेक वर्षानंतर रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. महत्त्वाचं म्हणजे या नाटकाच्या प्रमोशनसाठी सुख म्हणजे नक्की काय असतं.......हे नवीन सुंदर गाणंसुध्दा  सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

झी मराठी प्रस्तुत ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन या नाटकाची निर्मिती करत आहेत. 1998 साली रंगभूमीवर आलेल्या या सुपरहिट नाटकाच्या सिक्वलमधून ही लाडकी जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या धम्माल मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. अद्वैत दादरकर यांनी या नाटकाच्या लेखन व दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘झी मराठी अवॉर्ड्स 2018 ‘मध्ये या नाटकाच्या सिक्वलचा एक छोटासा भाग प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला होता.

चार दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट या नाटकांमधून नेहमीच आपली उत्तम केमिस्ट्री रंगवणारी प्रशांत दामले व कविता मेढेकर ही सदाबहार जोडी आता ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक घेऊन लवकरच येत आहेत. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा शुभारंभ येत्या 16 नोव्हेंबर रोजी होत आहे.

सर्वांनाच आता प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांची ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ पाहण्याची आतुरता लागली आहे.

https://youtu.be/fR8nPlCqdG8

Recommended

Loading...
Share