By  
on  

पाहा Photos: प्राजक्ता माळीचा सुरुय महाराष्ट्र दौरा

छोट्या पडद्यावरुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीची सध्या सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगलीय. ती मनसोक्त भटकतेय. हिंडताना-फिरतानाचे तिचे जबरदस्त फोटो ती सध्या सोशल मिडीयावर अपलोड करतेय, त्यामुळे हिचं नक्की सुरु काय असा प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित झाला. पण अखेर उत्तर सापडलंच. प्राजक्ता सध्या महाराष्ट्र दौ-यावर आहे. 

लवकरच प्राजक्ता 'माझा महाराष्ट्र' या अनोख्या ट्रॅव्हल शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या शोचं चित्रिकरण महाराष्ट्राच्या विविध भागांत जोरदार सुरु असल्याचं प्राजक्ता पोस्ट करत असलेल्या फोटोंवरुन समजतं. यानिमित्ताने महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती सर्वांपर्यंत पोहचणार आहे. 

आत्तापर्यंत प्राजक्ताने लोणावळा, मुंबई, पुणे, रत्नागिरी,कोल्हापूर, औरंगाबाद इत्यांदी ठिकाणी या कार्यक्रमाचं चित्रीकरण केलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Clicked just after my first ever scuba diving experience Did it in my very own Maharashtra(Ratnagiri) . Earth comprises of 71% water! I believe we should once in our lives explore the water life as well..; which is vast, mesmerising, colourful and meditative 71% amount of life should not be left unexplored... . Loved this scuba thing- I'm gonna do it again and again . #prajaktamali #scubadiving #livingfoodz #lforginal #mastmaharashtra #masttravel #mastpeople #mastfood #maharashtratourism #maharashtramaza #maharashtraforts #maharashtraTravel #maharashtrian #maharashtragovernment #food #people #culture #lifestyle #instatravel #travel #travelgirl #celebrity

A post shared by Prajakta Mali (@prajakta_official) on

 

लवकरच ती महाराष्ट्रातला पुढचा प्रवास सुरु करेल व ती माहिती आपल्यापर्यंत पोहचवत राहील. तोपर्यंत प्राजक्ताला 'हॅप्पी जर्नी'

 प्राजक्ता सूत्रसंचलन करत असलेला हा कार्यंक्रम मराठीसह हिंदी व इंग्रजीतही पाहायला मिळेल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

२०९ वर्षे जून्या घरातल्या स्वयंपाकघरात बसून फणसाचं सांजण( Sweet dish)केलं... मी- स्वयंपाकघर-रत्नागिरी-जूनं घर.... . ३-४ वर्षात कधीतरी असं घडतं... आजच्या तारखेप्रमाणे #29feb . #mastjourney #livingfoodz #prajaktamali #lforginal #mastmaharashtra #masttravel #mastpeople #mastfood #maharashtratourism #maharashtramaza #maharashtraforts #maharashtraTravel #maharashtrian #maharashtragovernment #food #people #culture #lifestyle #instatravel #travel #travelgirl #celebrity

A post shared by Prajakta Mali (@prajakta_official) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive