सेलिब्रिटी किंवा राजकारण्यांना ट्विटरवर ट्रोल करणं आता काही नवीन बाब राहिलेली नाही. प्रत्येक जण आपलं मत मांडताना किंवा प्रतिक्रीया देताना इथे पाहायला मिळतो. सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यांतलं अंतर सोशल मिडीयामुळे खुपच कमी झालं आहे. ते थेट आपलं मत सेलिब्रिटींपर्यंत पोहचवू शकतात. पण यामुळे ट्रोलिंगचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. त्यामुळे सेलिब्रिटींना याचा बराच ताण सहन करावा लागतो, हे तितकंच खरं. या ट्रोलिंगवर अभिनेता जितेंद्र जोशीने संताप व्यक्त केला आहे. "एकतर हे माध्यम सोडून द्यावं अन्यथा ट्रोलिंगला भीक न घालता व्यक्त होत रहावं, " असं त्याने म्हटलंय.
@meSonalee मतांचा आदर करणं फार पूर्वीच थांबलं. जिथे आज माणसं थोरामोठ्यांना , महापुरुषांना सोडत नाहीत, लतादीदी ना ट्रोल करतात तिथे सर्वसामान्य कलाकाराची काय बिशाद!! असो.. एकतर हे माध्यम सोडून द्यावं अन्यथा ट्रोलिंग ला भीक न घालता व्यक्त होत रहावं..
— Jitendra Joshi (@Jitendrajoshi27) March 5, 2020
तर त्याचं झालं असं, की अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एक ट्विटर ट्रोलिंगबाबत संतापजनक ट्विट केलं होतं. त्यावर जितेंद्रने आपली प्रतिक्रीया दिली आहे. सोनाली म्हणते, "ट्वीटरकरांनी आता कुठल्याही कलाकारांनी त्यांची मते, अभिप्राय, भावना, इ. समाज माध्यमांवर व्यक्त करावी अशी अपेक्षा करणं थांबवावं. कारण त्या मतांचं आदर करणं आपल्याला जमणार नाहीच. कलाकार व्यक्त होत नाही म्हणून आणि मग व्यक्त झाले तरीही #trolling हे सुरूच राहतं." या दोन्ही ट्विट्सवर पुन्हा ट्विटरकरांनी आपल्या प्रतिक्रीया द्यायला सुरुवात केली आहे.
ट्वीटरकरांनी आता कुठल्याही कलाकारांनी त्यांची मते, अभिप्राय, भावना, इ. समाज माध्यमांवर व्यक्त करावी अशी अपेक्षा करणं थांबवावं.
कारण त्या मतांचं आदर करणं आपल्याला जमणार नाहीच.कलाकार व्यक्त होत नाही म्हणून
आणि मग व्यक्त झाले तरीही #trolling हे सुरूच राहतं. #viciouscircle— Sonalee (@meSonalee) March 4, 2020