सिध्दार्थ जाधवने केला विजय पाटकर यांचा अॅप लॉंच

By  
on  

भारतीय चित्रपटसृष्टीची व्याप्ती खूप मोठी असून, या सृष्टीत वावरणाऱ्या कलाकारांच्या कामगिरीमुळे हिंदी तसेच इतर प्रादेशिक चित्रपटांचा बोलबाला दिवसागणिक वाढत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे. या प्रसिद्धीत मराठी चित्रपट आणि मराठी कलाकारदेखील मागे राहिलेले नाहीत. कारण, मराठी कलाकारांच्या चाहतेवर्गातदेखील प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे चाहत्यांच्या या गराड्यात टिकून राहण्यासाठी आणि आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी कलाकार मंडळी सतत प्रयत्नशील असतात. असाच एक प्रयत्न मराठीचे ज्येष्ठ आणि गुणी कलाकार विजय पाटकर यांनी केला आहे.

हिंदी तसेच मराठीच्या छोट्या आणि मोठ्या पडद्यावर कामगिरी बजावणारे विजय पाटकर, किनशीप हब या अॅपद्वारे आपल्या चाहत्यांच्या भेटीस येत आहे. त्यांच्या अभिनय कारकिर्दीची इत्यंभूत माहिती लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या या अॅपमुळे, विजय पाटकर यांना प्रेक्षकांसोबत जवळीकदेखील साधता येणार आहे. एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध करून देणाऱ्या या अॅपचे नुकतेच एका छोटेखानी समारंभात अनावरण करण्यात आले.

किनशिप हब या अॅपद्वारे विजय पाटकरांसोबत थेट संवाद साधण्याची संधीदेखील प्रेक्षकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय, हे अॅप विजय पाटकर यांच्या अॅडमीन नियंत्रणाखाली प्रसारित होत असल्याकारणामुळे, यात ट्रोलर्सना जागा नाही. थोडक्यात काय तर, या अॅपचा मनमुराद आनंद विजय पाटकर यांच्या खऱ्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना घेता येणार आहे.

Recommended

Loading...
Share