अमृता खानविलकर एक गुणी अभिनेत्री आहे याबाबत कुणाचंही दुमत नसावं. अमृताने अभिनय, नृत्य, स्टायलिंग अशा सगळ्याच आघाड्यांवर स्वत:ला सिद्ध केलं आहे. अमृता सध्या ‘खतरोंके खिलाडी’ या शोमधून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. यावेळी पीपिंगमून मराठीशी केलेल्या खास बातचीतमधून तिने अनेक बाबी शेअर केल्या आहेत. अमृता म्हणते, मला एरवी कशाचीही भिती वाटत नाही. पण मला आईपासून लांब असण्याची भिती वाटते.
अनेकदा असं वाटतं की आई कधी अडचणीत असेल आणि मी तिच्यापर्यंत वेळेवर पोहचू शकले नाही तर ! ही भिती सतत माझ्या मनात राहते. खास करून लग्नानंतर माझ्यात ही असुरक्षितता वाढली आहे. पण बिग बॉसमध्ये जाण्याबाबत अमृताचा निर्णय मात्र ठोस आहे. ती म्हणते, ‘ मी बिग बॉसमध्ये नक्कीच जाणार नाही. मला घरातूनच परवानगी नाही.
मुळात माझा नवरा हिमांशूला बिग बॉस आवडत नाही. त्याला हा अनेकदा वेळेचा अपव्यय वाटतो. त्यामुळे मी घरातही हा शो चोरुन चोरुन पाहावा लागतो.’ आवडत्या अभिनेत्यांबाबतही अमृताने शेअर केलं. अमृता म्हणते, ‘मराठीमध्ये मला रितेश देशमुखसोबत काम करायला आवडेल. तर हिंदीची लिस्ट खुप मोठी आहे. हिंदीमध्ये रणवीर सिंग माझी फर्स्ट चॉईस आहे. त्यानंतर मला विकी कौशलसोबत रोमॅंटिक सिनेमा करायला आवडेल. त्यानंतर आयुष्मन खुराणा आणि राजकुमार राव यांच्यासोबतही मला काम करायला आवडेल.’