बुरा ना मानो होली है….असं म्हणत आपण रंगाची बेधुंद धुळवड साजरी करतोय. ..उत्साह-चैतन्य वाढवणारा ह्या लाडक्या सणाची वर्षभर चातकासारखी वाट पाहिली जाते.
होळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा स. णसर्वांनी एकत्र येत आपली दुख, चिंता मिटवून जल्लोष साजरा करण्याचा सण. खमंग पुरणपोळीवर ताव मारण्याचा सण. बिनधास्त बोंबा ठोकून अनिष्ट व दृष्ट प्रवृत्तींना होलिका मातेच्या धगधगत्या ज्वाळांमध्ये नष्ट करण्याचा सण.
आज सर्वत्र धुळवडीचा उत्साह संचारला आहे, आपले लाडके मराठी सेलिब्रिटीसुध्दा आनंदात हा सण साजरा करतायत. त्यांनी चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. चला, तर पाहूयात काय म्हणतायत ते.