By  
on  

रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये पुन्हा खाकी वर्दीत झळकतोय लाडका सिध्दू

खाकी वर्दीतून सिंबा रणवीर सिंहला सावलीसारखी साथ देणारा संतोष तावडे म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका सिध्दू. बॉलिवूडचा एनर्जी मॅन म्हणून आपण जसं रणवीर सिंह हे नाव सर्वप्रथम घेतो. तसा मराठीतला एनर्जी मॅन म्हणून सिध्दार्थ जाधव हे नाव आग्राहानं घ्यावं लागतं.  त्याच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे.  बिग बजेट आणि बहुप्रतिक्षीत सूर्यंवंशी या बॉलिवूड सिनेमातून अभिनेता सिध्दार्थ जाधव  रसिकांच्या भेटीला येत आहे.

रोहित शेट्टीच्या अॅक्शन कॉप ड्रामा सूर्यवंशीमध्ये सुपरस्टार अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत आहे हे आपण सर्वचजण जाणतो. सर्वांनाच आता या बहुचर्चित सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. पण या सिनेमात अक्षयसोबतच  'सिंघम' अजय देवगण  आणि 'सिंबा'रणवीर सिंहसुध्दा आहेत, त्यामुळे धमाका तर होणारच. पण रणवीरसोबत पुन्हा एकदा लाडक्या सिध्दूची केमिस्ट्री पाहायला  चाहते आतुर झाले आहेत, यात शंका नाही. 

24 मार्चला मुंबईतील सर्व थिएटर्स 24x7सुरु राहणार आहेत आणि  25 मार्चला गुढी पाडवा आहे. म्हणूनच 'सू्र्यवंशी' हा सिनेमा  येत्या 24 मार्चच्या संध्याकाळी रसिकांच्या भेटीला येईल. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive