By  
on  

पाहा 'कोल्हापूर डायरीज'चा फर्स्ट लूक

'कोल्हापूर डायरीज' हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जो राजन या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत तर गायक-संगीतकार अवधूत गुप्ते प्रस्तुत या सिनेमाच्या निर्मितीची धुरा वजीर सिंग यांनी सांभाळली आहे. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमातून एक नवीन प्रेक्षकांसमोर येत आहे. भूषण नानासाहेब पाटील हा अभिनेता कोल्हापूर डायरीज या सिनेमात प्रमूख भूमिकेत झळकतोय. रांगडा आणि जबरदस्त लूक पाहून भूषण या सिनेमात काही अॅक्शन सीन्ससुध्दा करणार का याबाबच आता उत्सुकता निर्माण झाली आहे. जीवा असं त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे.

अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरलेल्या सुपरहिट मल्याळम सिनेमा ‘अंगमलइ डायरीज’चा ‘कोल्हापूर डायरी’ हा रिमेक आहे. एका शहराच्या प्रवास वर्णनावर हा सिनेमा आधारित असल्याचे समजते.

https://twitter.com/taran_adarsh/status/1063665566370562048

सध्या या सिनेमाची टीम कोल्हापूरमध्ये असून इथे शेवटचे शेड्यूल पार पडत आहे. ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन या सिनेमाबाबतची माहिती शेअर केली होती.अवधूत गुप्ते यांचे कोल्हापूर प्रेम आपल्याला माहितच आहे. त्यामुळे कोल्हापूरची झणझणीत मिसळ, लाल मातीतली कुस्ती आणि तिथलं अप्रतिम निसर्ग हे, यात पाहायला मिळणार यात काही शंका नाही. सर्वांनाच या सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागून राहिली आहे.

पुढीलवर्षी 'कोल्हापूर डायरीज' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive