काय म्हणालात, या मिसेस मुख्यमंत्री आहेत यावर तुमचा विश्वास बसत नाहीय. पण अहो, हे खरं आहे. पांडरा शुभ्र गाऊन परिधान केलेली ही परीराणी दुसरी तिसरी कुणी नसून तुमची लाडकी सुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंडगे आहे.
अमृताने नुकतंच शुभ्र पांढ-या रंगाचा वेस्टर्न गाऊन घालून एक नवीन फोटोशूट केलं आहे. त्यात ती खुपच गोड व खुलून दिसतेय. अमृताच्या हा प्रिन्सेस लुक पाहून ही तर आमची सुमी नाही बाबा, अशाच प्रतिक्रीया तिला मिळतील यात शंका नाही. पण तूर्तास तरी तिच्या या सुंदर फोटोशूटवर चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाई्क्सचा वर्षाव सुरु केला आहे.
अल्पावधीतच मिसेस मुख्यमंत्री ही मालिका रसिकांवर अधिराज्य गाजवतेय. सुखदु:खात नेहमी एकमेकांच्या पाठीशी असणारे समर व सुमी सर्वांचे लाडके आहेत. सर्वांची जिरवून मिरवणारी सुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंडगे मात्र प्रत्यक्ष आयुष्यात तितकीच बिनधास्त आहे.
सुमी या व्यक्तिरेखेमुळे अमृता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. पण सोशल मीडियावरही अमृता तिच्या स्टाइलस्टेटमेंटने सुद्धा आता लाडकी बनतेय