By  
on  

आस्ताद काळे आणि तेजश्री प्रधान झळकणार या नाटकात

झी मराठी लवकरच एक नवं कोरं नाटक घेऊन प्रेभकांच्या भेटीला येत आहे. हेमंत एदलाबादकर लिखीत-दिग्दर्शित या नाटकाची निर्मिती प्रसिध्द निर्मात्या लता नार्वेकर करत आहेत. बिग बॉस फेम आणि टीव्ही स्टार आस्ताद काळे याच्यासोबत या नाटकात होणार सून मी या घरची फेम अभिनेत्री तेजश्री प्रधान झळकणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने ही जोडी प्रथमच एकत्र येत आहे. श्री चिंतामणी प्रस्तुत एक बंडखोर नाटक 'तिला काही सांगायचंय' असं त्याचं नाव आहे.

https://www.instagram.com/p/BqReqJcgV7a/

'तिला काही सांगायचंय' या नाटकाची कथा आणि इतर कलाकार अद्याप गुलदस्त्यात आहेत. पण या दोघांना पाहून एखाद्या कपलवर ही कथा गुंफण्यात आल्याचा अंदाज येतोय.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive