माहेरची साडी आणि अलका कुबल हे अतूट नातं. हा सिनेमा पाहताना आजसुध्दा डोळे पाणावतात.अलकाताईंनी या सिनेमातून लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडले. हा सिनेमाच त्यांची ओळख बनला. अजूनही त्यांचा उत्साह वाखाणण्या जोगा आहे. त्यातही त्या रसिकांना वैविध्य देताना पाहायला मिळतात.
अलका कुबल यांनी समीर आठल्ये यांच्याशी लग्नगाठ बांधली. समीर हे प्रसिध्द सिनेमॅटोग्राफर आहेत. कॅमेरासमोर असणाऱ्या अलका व कॅमेरामागे असणारे समीर यांच्यात प्रेम कसं जुळलं, ह्या लव्हस्टोरीचं अनेकांना कुतुहल वाटतं. पण याच आठवणींना खुद्द अलकाताईंनी नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक फोटो पोस्ट करत उजाळा दिला. ‘जिथून सुरुवात झाली..’ असं कॅप्शन अलका यांनी या फोटोला दिलंय. हातात कॅमेरा धरलेले समीर व त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या अलका यांचा हा फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
अलकाताई एकीकडे विनोदी रिएलिटी शोचं परिक्षण करुन स्वत:चीच चौकट मोडू पाहतात तर दुसरीकडे राजकीय लालसेपोटी सशक्त अभिनय साकारत धुरळा उडवून देतात. आता लवकरच अलकाताई एका नव्या भूमिकेतून छोट्या पडद्यावर काळूबाईच्या रुपात रसिकांच्या भेटीला येत आहेत.