By  
on  

निर्मात्यांचे नुकसान टाळण्यासाठी दुखापत असतानाही सई ताम्हणकर शुटिंगला हजर 

‘मिमी’ या हिंदी सिनेमात अभिनेत्री सई ताम्हणकर झळकणार आहे. या सिनेमात क्रिती सनॉन, पंकज त्रिपाठी या कलाकारांसोबत सई झळकणार आहे. नुकतच या सिनेमाचं राजस्था येथे शूट सुरु होतं. या चित्रीकरणा दरम्यान सईच्या पायाला दुखापत झाली होती. सईचा पायाला फ्रॅक्चर झालं होतं. मात्र असं असतानाही सईने चित्रीकरण सुरु ठेवलं. 


मात्र सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर येत्या 19 मार्च ते 31 मार्चपर्यंत एन्टरटेन्मेंट विश्वातील सर्व शुटिंग बंद करण्यात येणार आहे. कलाकारांना, तत्रज्ञांनाही सुरक्षित राहता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. आणि या निर्णयानंतर बऱ्याच मालिका आणि सिनेमांचं चित्रीकरण आटोपलं जातय. काही ठिकाणी मालिकांच्या भागांचं बँकिंगसाठी शुटिंग केलं जातय. कलाकारही जास्तीचं काम करुन आपलं काम आटोपतायत.

त्यातच अभिनेत्री सई ताम्हणकर ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी रिएलिटी शोची परिक्षक आहे. मिमी सिनेमाचं चित्रीकरण संपंवून ती या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी परत आली  आहे.

 या कार्यक्रमाचंही चित्रीकरण बाकी होतं. आणि या कार्यक्रमाचं आणि निर्मात्यांचं नुकसान होऊ नये म्हणून सई ताम्हणकर नुकतीच या सेटवर पोहोचली आहे. सईने पायाला दुखापत असतानाही या कार्यक्रमाचं चित्रीकरण केलं आहे. 

 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive