देशावर सध्या कोरोना व्हायरस (COVID -19)चं संकट ओढावलय. मात्र या संकटातून स्वत:ला बाहेर कसं काढायचं हे आपल्याच हातात आहे. यासाठी विविध काळजी घेण्याचे आवाहन केलं जात आहे. काही ठिकाणी वर्क फ्रॉम होमची सुविधा सुरु करण्यात आली आहे. तर चित्रपट, मालिका, नाटक एकूणच मनोरंजन विश्वाचं काम बंद करण्यात आलं आहे. थिएटर, नाट्यगृहेही बंद ठेवण्यात आली आहेत. यातच या सगळ्यात घाबरून न जाता सध्या क्षणभर विश्रांती घेण्याची गरज असल्याचं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणतेय.
नुकत्याच एका प्रसिद्ध वृत्तपत्रासाठी लिहीलेल्या लेखात सोनालीने तिच्या ‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमाच संदर्भ देत सध्या घरात बसण्याची गरज असल्याचं आणि त्यात असलेला सकारात्मक दृष्टीकोन सांगीतला आहे. सोनाली म्हणते की, “या सगळ्यात आपला रोजचा वेग काहीसा मंदावेल, काही बिघडत नाही. आज थोडी विश्रांती घेऊन काही दिवसांनी नव्या जोमाने पुन्हा कामाला लागूच की. पण आज थोडं थांबू.”
यात सोनालीने सकारात्मक दृष्टिकोन दिला आहे. सोनाली पुढे म्हणते की, “आज आपण थोडं थांबलो आहोत तर जरा विचार करु आणि शर्यतीपासून काही काळ लांबच राहू. नुकत्याच वाचलेल्या काही सुंदर ओळी मी या निमित्ताने सांगते... थोडं थांबा वेळ द्या, स्वत:ला...! छंदाना..! निसर्गाला..! आरोग्याला..! नात्यांना..! समाजाला..! प्राणिमात्रांना..! आणि हो.. आयुष्य सुंदर आहे, सुंदर जगा..!”
यातच कोरोना व्हायरस्चाय भितीने नकारात्मकताही वाढत चालली आहे या लेखातून सोनालीने सकारात्मक विचार पसरवण्याचा प्रयत् केला आहे. सध्या बरेच कलाकार अशा पद्धतिने सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांना काळजी घेण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करत आहेत.