By  
on  

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील मुळशी तालुक्यातील जमिनीची विक्री स्व फायद्यासाठी  करुन १४ जणांना फसविल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. 

ही तक्रार जयंत बहिरट यांनी केली आहे. ९६ लाख ९९ हजार रूपयांची फसवणूक केल्याचं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह जयंत रामभाऊ म्हाळगी, सुजाता जयंत म्हाळगी या तिघांविरोधात  पुण्यातील पौड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२५ वर्षांपूर्वी जयंत म्हाळगी आणि सुजात म्हाळगी यांनी सुजाता फार्म प्रा. लिमिटेड अंतर्गत ‘गिरीवन प्रोजेक्ट’ कंपनीची स्थापना केली होती. त्यातील गिरीवन प्रोजेक्टचे अभिनेते विक्रम गोखले हे अध्यक्ष आहेत. हा प्रकल्प सरकारमान्य असल्याचं सांगत खोटी प्रलोभनं देऊन ग्राहकांना आकर्षित केलं, असा आरोप यांच्याविरोधात ठेवण्यात आला आहे.
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive