आपण सर्वच जण सोशल मिडीयाला कधी ना कधी नावं ठेवतोच. पण कधी कधी त्याच्यामुळेच अनेक चांगल्या गोष्टींसाठी किंवा सत्कार्यासाठीसुध्दा सोशल मिडीया कारणीभूत ठरतो हे विसरुन चालणार नाही. अशीच एक हदयस्पर्शी खरीखुरी कहाणी अभिनेता शशांक केतकरमुळे प्रकाशझोतात आली आहे.
डोबिंवली हे मुंबईचं उपनगर असली तरी हजारो लोक आज तेथे वास्तव्यास आहेत. दररोज तास-दीड तास प्रवास करुन ते कामा-धंद्यानिमित्त मुंबई गाठतात. पोटासाठी प्रत्येकाला धडपडावं हे लागतंच. पण डोंबिवलीतल्या एका 87 वर्षीय आजोबांबद्दल जर तुम्हाला समजलं तर तुम्हीसुध्दा हळहळ व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही.
डोंबिवलीच्या या आजोबांचा थक्क करणारा प्रवास शशांक केतकरने सोशल मिडीयावरुन सर्वांसमोर आणला आहे. हे आजोबा गाद्यांच्या दुकानातून पडदा, सोफा यांच्या कव्हरचे उरलेले तुकडे दुकानदारांकडून विकत घेऊन कापडी पिशव्या स्वतः घरीच शिवतात. ते सुध्दा वय वर्ष 84 असताना..पोटाची खळगी भरण्यासाठी याही वयात त्यांना हे करावे लागते…. 40 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत आजोबांकडे पिशव्या आहेत. आजोबा दर सोमवारी डोंबिवलीच्या गावदेवी मंदिरासमोर आणि गुरुवारी फडके रोड वर बसतात व त्या पिशव्या विकतात.
या जोशी आजोबांची भेट त्यांच्या घरी जाऊन शशांक आणि त्याची पत्नी प्रियांकाने अलिकडेच घेतली. त्यांचे हे कष्ट पाहून दोघंही गहिवरले. निदान त्यांच्याकडून दोन पिशव्या विकत घ्या अशी विनंती शशांकने डोबिंवलीकरांकडे केली आहे.
Watch the REAL STORY behind our cutest, much popular ‘पिशवीवाले’ Ajoba on my YouTube channel ‘INDEED CANDID’https://t.co/dAmnvMwFDv pic.twitter.com/r3IyrNNNkq
— Shashank Ketkar (@shashank_ketkar) March 17, 2020