By  
on  

अरेच्चा ! Photo पाहा मायलेकी अगदी सेम टू सेम

मराठी सिनेसृष्टीसाठी मैलाचा  दगड ठरलेला माहेरची साडी हा सिनेमा आणि अभिनेत्री अलका कुबल यांचं अतूट नातं. या सिनेमामुळे प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचलेल्या अलकाताईंचा अभिनय आजही लोकप्रिय ठरतो. काळानुरुप चालणा-या अलका कुबल यांनी अलिकडेच आजच्य तरुणाईसोबत धुरळा उडवून दिला. 

अलका कुबल या सोशल मिडीयावर सध्या ब-याच सक्रीय असतात. काही दिवसांपूर्वीच पतीसोबतचा एक जुना फोटो पोस्ट करुन चर्चेत आल्यानंतर आता पुन्हा अलकाताईंचा एक लेटेस्ट फोटो प्रचंड व्हायरल होतोय. या फोटोत त्यांनी चक्क लेकीसोबत वेस्टर्न आऊटफिटमधून ट्विनींग केलं आहे. मोठी लेक इशानीसारखाच ब्लॅक आणि ग्रे कलरचा स्ट्रीप असलेले वेस्टर्न आऊटफिट त्यांनी परिधान केला आहे. 

अलका कुबल या प्रसिध्द सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्या. त्यांना दोन लेकी आहेत. ईशानी व कस्तुरी. ईशानी ही वैमानिक आहे. तिला लहानपणापासून आकाशात उंच भरारी घेण्यांचं स्वप्नं होतं.ईशानीला २०१५ मध्ये वैमानिकांचं लाईफटाईम लायसन्स मिळालं आहे. आपल्या करिअरनिमित्ताने ती परदेशातच वास्तव्यास असते. लवकरच ती दिल्लीतील निशांत वालियासोबत लग्नगाठ बांधणार आहे. या दोघांचा रोका विधी अलिकडेच पार पडला. त्याचे फोटो तिच्या सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Daughter's roka ceremony️

A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23) on

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive