सोशल मिडीयावर सेलिब्रिटी आपल्या आयुष्यातील बहुतांश गोष्टी शेयर करत असतात. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोड सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मराठी अभिनेत्री सई लोकूरही तिच्याविषयीच्या सगळ्या गोष्टी सोशल मिडीयावर शेयर करते. नुकतच सईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचा लाडका कुत्रा बोनीच्या निधनाने ती दु:खी झाली आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात असतानाही सईने बऱ्याचदा तिच्या या पेटचा उल्लेख केला होता. त्याच्यासोबतचे फोटोही सई सोशल मिडीयावर पोस्ट करत असे.
मात्र बोनीच्या निधनानंतर त्याच्या दु:खात तिने सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने बोनीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये सईने बोनी हा तिचा बेस्ट फ्रेंड असल्याचेही पोस्टमध्ये म्हटले आहे.