कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता मनोरंजन विश्वाचं कामही बंद करण्यात आलं. 19 मार्च ते 31 मार्च या कालावधीसाठी मालिका, सिनेमा, नाटक, वेब सिरीज आणि इतर मनोरंजन विषयक कार्यक्रमांचं चित्रीकरण बंद करण्यात आलय. आणि म्हणूनच 19 मार्च आधीच काही मालिकांचं चित्रीकरण आटोपण्यात आलं. जास्तीचं काम करून बँकिंग एपिसोडचं शुटिंग करण्यात आलं. मात्र ज्या मालिकांच्या टीमला ते शक्य झालेलं नाही त्या मालिकांचे जुने भाग आता प्रसारित करण्यात येतील
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' ही मालिका प्रचंड लोकप्रीय आहे. या मालिकेच्या बाबतीतही असचं होणार आहे. या मालिकेत बाळुमामाची भूमिका साकारणारा सुमित पुसावळे याने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यातून सुमितने मालिकेविषयी महत्त्वाची घोषणा केली आहे. या मालिकेचं चित्रीकरण आदेशानुसार थांबवण्यात आलय. मात्र चित्रीकरण त्यामुळे रखडलयं. आणि म्हणूनच या मालिकेचे जुने भाग प्रसारित होणार असल्याच सुमितने या व्हिडीओच्या माध्यमातून सांगीतलं आहे.
अशा बऱ्याच मालिकांचे आणि सिनेमांचे चित्रीकरण कोरोनाचं आलेलं भयानक सावट टाळण्यासाठी बंद करण्यात आलयं. मात्र हे कलाकारा आणि तंत्रज्ञ या परिणामाला सामोरं जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र मनोरंजन विश्वाला याचा मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय.