कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होमचा मार्ग निवडलाय. तर मनोरंजन क्षेत्रातील चित्रीकरण हे 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे कलाकार मंडळी घरीच राहणं पसंत करत आहेत. काही कलाकार घरात बसूनही आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरातच वर्कआउट करत आहेत.
सध्या जीमसह बरीच ठिकाणं बंद आहेत या पार्श्वभूमिवर बऱ्याच गोष्टी घरातूनच करण्याचा पर्याय उपलब्ध आहेत. म्हणूनच बरेच कलाकार घरातूनच व्यायाम आणि योगा करत आहेत. नुकतच अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचा योगा करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्राजक्ता योगा आणि मेडिटेशन करतेय.
तर अभिनेत्री श्रिया पिळगावकरही घरातच बसून व्यायाम करतेय. श्रियाने तिचा व्हिडीओही सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. य़ा व्हिडीओ ती तिचा कुत्रा जॅकसोबत मस्ती करताना दिसत आहे.बरेच कलाकार सध्या सोशल मिडीयावर ते घरात बसून काय करत आहेत याचा व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट करत आहेत, जेणेकरुन कोरोना व्हायरसने निर्माण झालेल्या भितीचं रुपांतर सकारात्मक दृष्टीकोनात होईल.