By  
on  

पाहा Video : निर्भयाच्या आत्म्याला आज खऱ्या अर्थाने शांती मिळालीय  - स्वप्निल जोशी

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या चार दोषींना आज फासावर लटकविण्यात आले. या बातमीने सगळ्यांनीच सुखाचा निश्वास घेतला. एकीकडे कोरोनाच्या सुळसुळाटाने भयभित झालेले भारतीय या बातमीने सुखावले. यावर बऱ्याच कलाकारांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 
अभिनेता स्वप्निल जोशीनेही यावर प्रतिक्रिया देत या लढ्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाचं कौतुक केलय. स्वप्निल म्हणतो की, “त्या चारही राक्षसांना आज फासावर लटकवण्यात आलं. आणि जेव्हा तो खटका ओढला गेला तेव्हा मला असं वाटत की फाशी त्या फक्त चौघांना नाही मिळाली तर ती त्या प्रत्येक विचारसरणीला आज देण्यात आली ज्यांना असं वाटतय की बायकांना कसही वागवलं तर चालतय. त्या प्रत्येक विचारसरणीला आज सकाळी फाशी देण्यात आली. आणि पुन्हा एकदा हे अधोरेखीत करण्यात आलं की देशातली प्रत्येक निर्भया आता एकटी नाही. प्रत्येक स्थरावर या गोष्टीचं कौतुक होत आहे. पण विशेष कौतुक व्हायला पाहिजे निर्भयाच्या आई-वडिलांचं ज्यांनी सात ते सव्वा सात वर्षे हा लढा दिलाय आणि त्या प्रत्येकाचं जे या लढ्यात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#nirbhaya #nirbhayaverdict #nirbhayajustice

A post shared by

Author

Recommended

PeepingMoon Exclusive