By  
on  

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरने दिला हा संदेश

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरची प्रसिद्धी दिवसागणिक वाढत आहे. वाजले की बारा म्हणत अवघ्या महाराष्ट्राला आपल्या तालावर ठेका धरायला लावणारी अमृता मराठीसोबतच हिंदीतही आपली विशेष छाप पाडताना दिसून येते. बाजी, सत्यमेव जयते आणि वेबसिरीजमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर अमृताची सोशल नेटवर्किंग साईटवर एक जाहिरात मोठ्या प्रमाणात खुप व्हायरल होतेय.

काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या 'वर्ल्ड टॉयलेट डे' वर आधारित असलेल्या या जाहिरातीत अमृताने समानतेचा संदेश दिला आहे. घरातली माणसे जशी समान असतात, अगदी तशीच समान घरकाम करणारी बाईदेखील असते. ती धुणीभांडी आणि स्वयंपाक करून घरातल्या सर्वांची काळजी घेत असते, त्यामुळे तिलादेखील घरातल्या सदस्यांइतकाच मान -सन्मान मिळायला हवा. तीसुध्दा आपल्यासारखीच एक माणूस आहे. असा संवेदनशील संदेश अमृता या जाहिरातींमार्फत प्रेक्षकांना देत आहे.

https://www.instagram.com/p/BqbymGjF7-a/

या जाहिरातीमुळे, अमृता एका कुशल अभिनेत्रीबरोबरच समाजातील एक सुजान नागरिकदेखील आहे, याचा  प्रत्यय आपल्याला येतो.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive