तुम्हाला मिळू शकते चक्क महेश मांजरेकर यांच्यासोबत काम करण्याची संधी, वाचा सविस्तर

By  
on  

प्रत्येकाला आयुष्यात एका संधीची आवश्यकता असते. त्या संधीची तो वाट बघत असतो. मनोरंजन विश्वाच्या झगमगाटी दुनियेचंही तसंच आहे.प्रत्येकाला इथे चमकायचं असतं, आपल्यातील कलागुण सादर करायचे असतात. आता करोनामुळे तर सर्वच कोलमडलं आहे. सर्व घरीच बसून आहेत, पण तुमच्यात जर टॅलेण्ट असेल आणि काही करुन दाखवायची जिद्द असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली  आहे. तुम्हाला मिळू शकते चक्क मराठीतले प्रसिधद् अभिनेते-दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांच्यासोबत काम करण्याची संधी. 

महेश मांजरेकरांनीच ही माहिती त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन दिली आहे. महेश मांजरेकर फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, नमस्कार, मी महेश मांजरेकर... सध्या कोरोनामुळे शूटिंग्ज बंद आहेत. नाटकांचे प्रयोग थांबलेले आहेत. मीसुद्धा घरी बसूनच पुढील सिनेमाचं लिखाण करतोय. एकूण सगळीकडेच वर्क फ्राॅम होम सुरु आहे. काही मित्रांशी बोलत असताना असं लक्षात आलं की घरी बसून करायचं काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. कदाचित तुम्हालाही पडला असेल. म्हणून मग एक विचार आला तुम्हाला एक ॲक्टीव्हीटी द्यावी.

बऱ्याच काळापासून मी ऐकतोय की माझ्या किंवा माझ्या कंपनीच्या नावाने महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी auditions सुरु असतात. त्यावर काहीतरी इलाज करायचा असं बरेच दिवस डोक्यात होतं. एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की मी कधीही अशा auditions घेत नाही. पण आता पहिल्यांदा मी Online Audition चं आवाहन करतोय. तुम्ही कोणत्याही वयातले असाल, तुम्हाला अभिनयाची आवड असेल, तुमचं अभिनयाचं शिक्षण झालं असेल तर तुम्हाला आवडतील ते डायलाॅग्ज, आवडेल तो परफाॅर्मन्स आम्हाला मोबाईलवर शूट करुन पाठवा, सोबत तुमची माहिती, तुमचे फोटो, संपर्क क्रमांकही पाठवा. यासाठी ई-मेल आयडी आहे - [email protected] माझी टीम (जी सध्या घरीच बसलेली आहे) ते या माहितीचं संकलन करतील. तुमचं नाव आमच्याकडे रजिस्टर केलं जाईल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.
 

Recommended

Loading...
Share