By  
on  

पाहा Video : ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतील हे कलाकार म्हणतात "Go Corona"

सध्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता बहुतांश लोकांनी घरीच राहणं पसंत केलं आहे. राज्य सरकारने तश्या सुचनाही वेळोवेळी केल्या आहेत. त्यातच कलाकार मंडळी घरी बसून विविध गोष्टी करताना दिसत आहेत. कुणी सोशल मिडीयावर काहीना काही फोटो किंवा पोस्ट करत आहेत तर काही घरात बसून आपला छंद जोपासत आहेत. 

@hemangiikavi

these cute ##munchkins made me laugh like how! ##tejasbarve @amrutadhongade5 ##foryou ##gocorona ##mrsmukhyamantri ##foryoupage @zeemarathi_official

♬ original sound - Hemangii Kavi

अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या टीक टॉकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मिसेसे मुख्यमंत्री या मालिकेच्या सेटवरील हा जुना व्हिडीओ आहे. या व्हिडीओत मिसेस मुख्यमंत्री साकारणारी सुमी आणि समर पाटील दोघंही आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा "गो कोरोना" असं म्हणतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. आणि असाच व्हिडीओ या मंडळींनीही केला आहे.सूम आणि समर म्हणजेच अमृता आणि तेजसनेही "गो कोरोना" म्हणत हा गमतीशीर व्हिडीओ केलाय. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडीओतून फक्त विनोद निर्मितीचा प्रयत्न केला असून कोणत्या भावना दुखवण्याचा या कलाकारांचा प्रयत्न नक्कीच नाही. ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय असून सूमी आणि समर पाटील ही जोडी प्रेक्षकांना आवडते.


सध्या या परिस्थितीत घरात बसून ही कलाकार मंडळी सकारात्मक दृष्टीकोन डोक्यात ठेवून सोशल मिडीयावर व्यक्त होत आहेत. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive