By  
on  

जुई आणि साकेत परत आले आहेत, “आणि काय हवं” ? 

सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर घरात बसून काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. एकिकडे थिएटर्स बंद असल्याने सिनेमांचं प्रदर्शन थांबलयं, तर शुटिंग बंद असल्याने मालिकांचेही शुटिंग रखडलय. नाट्यगृहेही बंद आहेत. या सगळ्याचा फायदा सध्याच्या परिस्थितीत वेब प्लॅटफॉर्मला होताना दिसतोय. 

अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत ही रियल लाईफ जोडी रिल लाईफमध्ये ‘आणि काय हवं या वेब सिरीजमध्ये झळकली होती. या स्वीट वेब सिरीजला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिरीजमध्ये जुई आणि साकेत हे अतिशय गोंडस कपल आहेत. प्रिया आणि उमेश या भूमिका साकारत असल्यानं त्यांची कमाल केमिस्ट्री यात पाहायला मिळाली होती. आणि हेच जुई आणि साकेत आता पुन्हा परतले आहेत. कारण ‘आणि काय हवं’चं दुसरं सिझन नुकतच प्रदर्शित झालं आहे. नुकताच या सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मागील सिरीजला मिळालेला प्रतिसाद पाहता याचं दुसरं सिझनही प्रदर्शित करण्यात आलं. सध्या बहुतांश लोकं घरीच बसून असल्याने घरी बसलेल्या प्रेक्षकांना याचा आस्वाद घेता येणार आहे. 

याआधी उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी 2013 मध्ये आलेल्या ‘टाईम प्लीज’ या मराठी सिनेमात एकत्र झळकली होती. ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिन कमाल केमिस्ट्री असणाऱ्या या कपलला आता या निमित्ताने पुन्हा एकत्र पाहायला मिळेल. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive