By  
on  

 पाहा Video : मराठी कलाकारांनी केलं जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन, सोशल मिडीयावर #isupportjanatacurfew चा ट्रेंड 

देशात येत्या रविवारी म्हणजेच 22 मार्च 2020 रोजी जनता कर्फ्यू लागू करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगीतलं. हा कर्फ्यू सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत असेल. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नेरंद्र मोदी यांनी गुरुवारी संपूर्ण देशाला संबोधित केलं आणि यावेळी जनता कर्फ्यूची घोषणा केली.  उद्या पार पडणाऱ्या या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्याचं कलाकार मंडळी आवाहन करत आहेत. विशेष करून मराठी कलाकार कोरोनापासून बचाव करण्यासाठीची जागरुकताही निर्माण करत आहेत. जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्यासाठी घरातच थांबा असं ही कलाकारा मंडळी सांगत आहेत. शिवाय 5 वाजता डॉक्टर, सरकारी कर्मचारी आणि इतर जी  लोकं स्वत:च्या  जिवाचा विचार न करता सगळ्यांची काळजी घेत आहेत त्यांच्या अभिनंदन उपक्रमात सगळे सहभागी होण्याचही आवाहन करत आहेत.

सरकारच्या नियमांचं पालन करत जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करत आहेत दिग्दर्शक केदार शिंदे. याविषयीचा व्हिडीओही त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. 

अभिनेत्री मृणाल दुसानीसही व्हिडीओच्या माध्यमातून याची जागरुकता निर्माण करतेय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PeepingMoon Marathi (@peepingmoonmarathi) on

विनोदी कलाकार भाऊ कदमनेही व्हिडीओच्या माध्यमातून जनता कर्फ्यूची सुचना पाळली पाहिजे.

पंतप्रधान आणि भारत सरकारने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा आणि गरजेचा असल्याचं म्हणत अभिनेत्री स्मिता गोंदकर या निर्णयाचा नक्कीच फायदा होणार असल्याचं म्हणतेय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My dear Instagram friends...

A post shared by Shilpa Tulaskar (@shilpatulaskar) on

अभिनेत्री शिल्पा तुळसकरचाही या कर्फ्यूला पूर्ण पाठिंबा असल्याचं म्हणते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I support #janatacurfew U??? #gocorona #indiafightscorona

A post shared by Dhanashri Kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri) on

अभिनेत्री धनश्री कडगावकरनेही व्हिडीओच्या माध्यमातून या कर्फ्यूला पाठिंबा देणार असल्याचं सांगतेय. 

अभिनेत्री मधुरा वेलणकरनेही याविषयी जागरुकता निर्माण करण्याचं व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हे आणि इतर बरेच कलाकार या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्यासाठी घरातच बसण्याचं आवाहन करत आहेत. या सकारात्मक दृष्टीकोनातून आपण कोरोना व्हायरस या भयानक आजाराचा सामना करू शकतो आणि या आजारापासून आपला बचाव करु शकतो एवढं नक्की. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive