By  
on  

Video : अग्गंबाई ! सासूबाई सांगतायत,तेव्हा आता तरी पटलं ना?

करोनाचा कहर दिवसेंदिवस भारतात वाढतच चालला आहे. महाराष्ट्रात तो वेगाने हातपाय पसरतोय. सरकारने पुढचा धोका टळवा म्हणून संपूर्ण शहरं लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईची जीवनवाहिनी लोकलसुध्दा आता बंद करण्यात आली आहे. चीन, इटली आणि स्पेनसारखी स्थिती आपल्या देशात उध्दभवू नये म्हणून सरकारकडून युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच एक सुजाण नागरिक म्हणून आपणही सरकारच्या सूचनांचं आणि नियमांचं काटेकोर पालन करणं ही आपली जबाबदारी आहे. 

पण करोना हे संकट परतवून लावताना अफवांनासु्ध्दा चांगलंच पेव फुटलं आहे व आपण त्यांना खत-पाणी अजिबातच घालू नये. कोणी म्हणतंय कोंबडी, कुत्रे आणि इतर प्राणी यांच्यामुळे हा व्हायरस वेगाने पसरतो. पण तसं बिलकुल नाही. हा फक्त एक गैरसमज आहे. सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आणि तुमच्या सर्वांच्या लाडक्या अग्गंबाई सासूबाई म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी नागरिकांना हेच आवाहन केलं आहे. 

 

निवेदिता सराफ म्हणतात, ह्या तुमच्या पिल्लांना तुमच्यापासून दूर करु नका, प्राण्यांमुळे कुठलाही व्हायरस पसरत नाही, त्यांना तुमच्यापासून दूर करु नका. त्यांच्यामुळे फक्त आणि फक्त प्रेम पसरतं. असं म्हणत त्यांनी त्यांच्या लाडक्या कुत्र्याला जवळ घेत आंजारत गोंजारत सांगितलं आहे. 

तेव्हा लाडके सेलिब्रिटी जेव्हा हे असे गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घेतात तेव्हा चाहते आणि नागरिकांनी ते नक्कीच ऐकायला हवं. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive