By  
on  

पाहा Video : “में कल्ले कल्ले खुश हूँ..” म्हणत आहेत शाल्मली आणि अमृता 

गायिका शाल्मली खोलगडेचं नुकतच कल्ले कल्ले खुश हूँ हा व्हिडीओ सिंगल प्रदर्शित झाला. शाल्मलीने या गाण्यात जबरदस्त डान्स केला आहे. शाल्मलीच्या या गाण्याला आणि व्हिडीओला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आणि याच गाण्यावर विविध कलाकारांसोबत या गाण्याच्या हूक स्टेपसोबत व्हिडीओ करायचं शाल्मलीने ठरवलं. त्याचे व्हिडीओही तिने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.

मात्र काही आठवड्यापूर्वी शाल्मलीने याच गाण्यावर अभिनेत्री अमृता खालनविलकरसोबत व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमध्ये शाल्मली आणि अमृता एकत्र डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओत दोघी या गाण्याच्या हूक स्टेप करताना दिसत आहेत. अमृता आणि शाल्मलीचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रेक्षकांना चांगलचा आवडतोय. नुकताच शाल्मलीने हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रदर्शित केला आहे. मात्र हा व्हिडीओ काही आठवड्यापूर्वी शुट केल्याचही तिने यात नमूद केलं आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोणतही चित्रीकरण होत नसल्याने शाल्मलीने हा व्हिडीओ बऱ्याच दिवसांपूर्वी शूट केल्याचं नमूद केलय. 

शाल्मलीने असाच व्हिडीओ विजे अनुषा दांडेकर आणि काही डान्स कोरिओग्राफर्ससोबतही शुट केलाय. सोशल मिडीयावर या गाण्यासाठी शाल्मलीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive