By  
on  

“जातील हेही दिवस जातील...”, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची कविता

कोरोना व्हायरस या भयानक आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. यावर सरकार विविध घोषणाही करत आहेत. त्यातच घरात बसण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. घरात बसून करायचं काय ? हा प्रश्न सगळ्यांना पडलाय मात्र घरात करण्यासाठीचे बरेच पर्याय सगळ्यांना उपलब्ध आहेत. काही आपला छंद जोपासत आहेत तर काही आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. यातच कवितेची आवड असणाऱ्यांना घरात बसून निवांत वेळ मिळाल्याने या कविता सोशल मिडीयाच्या माध्यमातून समोर येत आहेत. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेलाही अशीच एक कविता सुचली आहे. मात्र त्याची ही कविता सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करते. संकर्षणने स्वत: लिहीलेली ही कविता त्याने एका व्हिडीओच्या माध्यमातून वाचून दाखवली आहे. आणि हा व्हिडीओ त्याने त्याच्य सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केला आहे. 

“जातील हेही दिवस जातील...” असं या कवितेचं शिर्षक असून ही कविता कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर सकारात्मक दृष्टीकोनाने पाहण्याची उर्जा  देतेय.
शिवाय या व्हिडीओमध्ये संकर्षण म्हणतो की, “या दिवसात आपल्याला धिराने राहणं, संयमाने राहणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच ‘जातील हेही दिवस जातील असं’ या कवितेचं शिर्षक आहे.”


संकर्षणला कविता करण्याची आवड आहे. अधूनमधून सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याची ही कला पाहायला मिळते. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive