By  
on  

गुढी पाडव्याच्या खरेदीसाठी घराबाहेर जाऊ नका, देव रागवत नाही : शरद पोंक्षे

राज्यात करोना व्हायरसमुळे नुकताच चौथा बळी गेल्याचं वृत्त आहे. ६४ वर्षीय इसमाचा यात मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत करोनाची लागण झाल्याने तिघांचा बळी गेला होता. आता ही संख्या ४ वर पोहचलीय.करोनाला आता गांभिर्याने घेण्याची गरज आहे. 

रविवारी जनता कर्फ्यूदरम्यान दिवसभर नेटाने कर्फ्यू पाळल्यानंतर अनेकांनी रस्त्यावर येऊन धुडगूस घातला आणि यंत्रणावरचा ताण वाढवला. त्यानंतर सरकारने अनेक कठोर नियम लादले. संचारबंदी, शहर लॉकडाऊन करण्यासारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. आपलं सरकार या करोनाविरुध्द युध्दपातळीवर काम करतंय व हे संकट परतवून लावण्यासाठी एक सुजाण नागरिक म्हणून सरकारला संपूर्ण सहकार्य करणं ही आपली जबाबदारी आहे. 

गुढी पाडवा उद्यावर येऊन ठेपला आहे. कुठलंही गांभिर्य न घेता सणाच्या खरेदीसाठी लोक बाजारात गर्दी करण्याची दाट शक्यता आहे, याच विषयावर अभिनेते शरद पोंक्षे यांनी फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांना वास्तवाची जाणीव करुन देत कळकळीची विनंती केली आहे. 

 

शरद पोंक्षे फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात...

नमस्कार परवा जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिल्यानंतर सायं ५ वा काही मुर्खांनी सायं रस्त्यावर उतरून जल्लोश साजरा केला ,मिरवणुका काढल्या,आणि सगळ्यावर पाणी टाकलं. म्हणून आज हे लिहावस वाटलं
,कारण ऊद्या गुढीपाडवा, राष्ट्रीय दिनदर्शिकेनुसार नुतनवर्षाची सुरवात.चैत्रशुध्द प्रतिपदा.फक्त हिंदूंचं नविन वर्ष नाही, तर हे भारताचं नविन वर्ष .दर वर्षी हा सण आपण वाजत गाजत साजरा करतो सकाळी स्वागत यात्रा काढतो. आदल्या दिवशी खरेदी साठी बाजारात गर्दी करतो.पण ह्या वर्षी हे सगळं करायच नाहीये.देश व जग कोरोना च्या महासंकटाशी सामना करतोय. आपण सरकारी आदेश पाळलेच पाहिजेत. हे कंपलसरी आहे. जे घरात उपलब्ध आहे त्यात काय ते गोड पदार्थ बनवा. जे साहित्य उपलब्ध आहे त्यात गूढी ऊभी करा.त्याचीखरेदी करायला बाहेर पडायची गरज नाही. देव रागवत नाही की चीडत नाही. धर्मही भ्रष्ट होत नाही.संकट दाराशी उभं आहे.कधिही घरात प्रवेश करू शकतं.जर ते आत आले तर मग आपल्याच गूढ्या ऊभ्या कराव्या लागतील.

ह्यातली गंभीरता लक्षात घ्या.कोरोना संकट टळलं की मग एक दिवस गुढीपाडवा साजरा करू. पण आता घरातल्या घरातच जे साहित्य उपलब्ध आहे त्यात करूया. ही कळकळीची विनंती आहे. हे सर्वांपर्यंत पोचवा.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive