पाहा Photos : या अभिनेत्रींचे गुढीपाडव्याचे इन्स्टाग्राम फोटो तुम्हाला करतील घायाळ, गुलाबी रंगाच्या साडीत दिसल्या सौंदर्यवती 

By  
on  

सोशल मिडीयावर सुंदर फोटो पोस्ट करण्यासाठी सण उत्सवाशिवाय कोणतं चांगलं निमित्त असू शकेल ? आणि हेच निमित्त मराठमोळ्या अभिनेत्रींनाही असतं. सणांना मराठमोळ्या वेशभूषेतीला या सौंदर्यवतींचे फोटो सोशल मिडीयावर चर्चेत असतात. 
गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने मराठी कला विश्वातील अभिनेत्रींने सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. कोरोना व्हायरसवर मात करत आनंदाची गुढी उभारत या अभिनेत्री गुढीपाडव्याचा सण घरातच साजरा करत आहेत. मात्र त्यांनी पोस्ट केलेल्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. यातच गुलाबी रंगाच्या साडीत या सुंदर अभिनेत्रींचं सौंदर्य आणखी खुललय. बऱ्याच मराठी अभिनेत्रींनी पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये गुलाबी रंगाची साडी कॉमन दिसतेय. 


अभिनेत्री नेहा पेंडसेचा लग्नानंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा आहे. त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा तिच्यासाठी स्पेशल ठरलाय. या निमित्ताने नेहाने गुलाबी रंगाची साडी  नेसली होती. गुलाबी रंगाच्या साडीत नेहाचं सौंदर्य खुलून दिसतय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कोरोना विरूद्ध लढाईच्या विजयाची “गुढी” आत्ताच उभारू. कारण आपण हा लढा नक्कीच जिंकणार आहोत. आपल्या घरी छान गुढी उभारू. काहीही खरेदी करायला बाहेर पडू नका.. घरातल्याच काही सुंदर वस्तूंनी गुढी सजवूया आणि या लढ्यात विजय मिळू दे , सगळ्यांना निरोगी आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना करूया. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या मन:पूर्वक शुभच्छा..! • • • #gudhipadwa #newyear #newlife #coronaindia #fight #wecandoit #healthylife #stayhome

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official) on

अभिनेत्री सायली संजीवनेही गुलाबी रंगाची सारी नेसलेला फोटो पोस्ट केला आहे. काळ्या रंगाच्या ब्लाऊजने या पेहरावाला वेगळा लुक दिला आहे. शिवाय केसात माळलेला गजरा आणि गोल्डन रंगाच्या नेकपीसमध्ये सायली अतिशय सुंदर दिसतेय. 


‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दाताराने तिचा पारंपारिक लूक मधील क्लोजअप फोटो पोस्ट केलाय. यात गायत्रीनेही गुलाबी साडी आणि त्यावर मॅचिंग गुलाबी ब्लाऊज असा पेहराव दिसतोय. डोक्यात माळलेल्या गुलाबाच्या फुलाने लूक हटके वाटतोय. 


अभिनेत्री ईशा केसकरनेही गुलाबी रंगाची साडी नेसलेला फोटो पोस्ट केला आहे. मोकळ्या केसांमध्ये ईशाचा हा लूक उठून दिसतोय. साडीवर कमी दागीने घातलेल्या सिंपल आणि सुंदर असा हा ईशाचा लूक आहे. 
अभिनेत्री नेहा पेंडसेनेही गुलाबी साडी आणि त्यावर गुलाबी रंगाचा ब्लाऊज असा हा लूक आहे. नेहाने नथ घातल्याने या लूकमध्ये मराठमोळा पारंपारिकपणा जाणवतोय.

Recommended

Loading...
Share