By  
on  

या support system शिवाय जगण्याची साधी कल्पनाही करु शकत नाही : स्पृहा जोशी

आता देशात तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधानांनी जाहीर केला आहे. घरात बसणं कितीही कंटाळवाणं वाटत असलं तरी एक सुजाण नागरिक म्हणून त्या नियमांचं पालन करणं व स्वतची, कुटुंबियांची या करोनाच्या प्रादुर्भावापासून काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. 

आपण प्रत्येक जण कधी ना कधी टेक्नॉलॉजीला नावे ठेवत असतो, त्याच्या नावाने शंख करतो. पण आज हीच टेक्नॉलॉजी लॉकडाऊन व क्वारंन्टाईनच्या काळात आपल्या मदतीला कशी उभी आहे व जीवनाचा अविभाज्य भाग कसा बनली आहे, याचं उत्तम उदाहरण देत टेक्नॉलॉजीच्या महत्त्वावर प्रकाशझोत टाकलाय संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणा-या स्पृहा जोशीने. 

स्पृहा म्हणते, सध्या आपलं अवघं जग त्या फोनभोवतीचं सामावलेलं आहे. “सगळ्या गोष्टी त्यावरच आहेत. पैशाच्या व्यवहारांपासून जवळच्या माणसांपर्यंत आणि फोटो मधल्या आठवणींपासून ते आवडत्या गाण्यापर्यंत. मेडिटेशनचंही ॲप आणि चळवळ करणाऱ्या कँडी क्रशचंही ॲप. डोळे चिटकवून ठेवणाऱ्या नेटफ्लिक्स पासून ते फोन खाली ठेवून हे gratitude journal लिहायची आयडिया देणाऱ्या pinterest पर्यंत सगळंच तर आहे फोनवर. मी माझ्या या support system शिवाय जगण्याची साधी कल्पनाही आता करू शकत नाही.”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Gratitude Diary #Quarantine #Day2 . #2 What technology are you grateful for ? फोन! कितीही शिव्या घातल्या तरी फोन. एक खांबी तंबू झालाय फोन सध्या. सगळ्या गोष्टी त्यावरच आहेत. पैशाच्या व्यवहारांपासून जवळच्या माणसांपर्यंत आणि फोटो मधल्या आठवणींपासून ते आवडत्या गाण्यापर्यंत. मेडिटेशनचंही ॲप आणि चळवळ करणाऱ्या कँडी क्रशचंही ॲप. डोळे चिटकवून ठेवणाऱ्या नेटफ्लिक्स पासून ते फोन खाली ठेवून हे gratitude journal लिहायची आयडिया देणाऱ्या pinterest पर्यंत सगळंच तर आहे फोनवर. मी माझ्या या support system शिवाय जगण्याची साधी कल्पनाही आता करू शकत नाही. . so या फोनच्या शोधकर्त्यांना लाख लाख सलाम. Thank you Alexander Graham Bell. Also, Martin Cooper who invented the first ever mobile phone. Motorola was the first company to produce it on April 3, 1979. हे सुद्धा आत्ताच फोनमुळे कळलंय. तुमची सगळ्यात आवडती technology कोणती? कुठल्या  technology बद्दल तुम्हाला सगळ्यात कृतज्ञ वाटतं? मला नक्की सांगा.. - स्पृहा ️

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

तुम्हीसुध्दा अशा कोणत्या तंत्रज्ञानाचे आभार मानता,ज्याभोवती तुमचं संपूर्ण जग सामावलंय किंवा त्याशिवाय तुमचं पान हसत नाही. त्याबद्दल तुम्हीसुध्दा अशीच स्पृहा साऱखी क्वारंन्टाईनच्या काळात कृतज्ञता दाखवा. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive