पाहा Video :  “बिनडोकपणा सोडा आता कहर करु नका.. गप घरी बसा” म्हणतोय अभिनेता पुष्कर जोग 

By  
on  

सध्या कला विश्वातील सगळे कलाकार घरीच बसून आहेत. काही कलाकार याचा चांगलाच सुदपयोग करत आहेत. एकीकडे काही कलाकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहेत. 
त्यातच मराठी अभिनेता पुष्कर जोगने सगळ्यांना हटके पद्धतीने आवाहन केलं आहे. कोरोना गोचा ट्रेंड सध्या सोशल मिडीयावर प्रचंड आहे. याच पार्श्वभूमीवर पुष्कर जोगचं हे रॅप साँग आहे. हे रॅप पुष्करनेच गायल असून त्यानेच याचं घर बसल्या शुटिंग केलेलं आहे. सध्या लॉकडाउन असतानाही काही लोकं घराबाहेर पडत आहेत. आणि त्या लोकांना आवाहन करण्यासाठी पुष्करने हा रॅप व्हिडीओ तयार केला आहे. 
सोशल मिडीयावर पुष्करच्या या व्हिडीओला चांगलीच पसंती मिळत आहे.

मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात पुष्कर जोग स्पर्धक म्हणूनही होता.  या शोमध्ये पुष्करला दुसऱ्या क्रमांकाचं विजेतेपद मिळालं होतं.

 

 सध्या घरात बसून कलाकार मंडळी त्यांचा छंद जोपासत  आहेत तर काही आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. 
 

Recommended

Loading...
Share