ट्रोलरवर भडकले महेश मांजरेकर, शिवीगाळ करणाऱ्या ट्रोलरला म्हटले “तुला शोधून काढेल”

By  
on  

सोशल मिडीयावर ट्रोलिंग हे काही नवीन नाही. खासकरून मनोरंजन विश्वातील कलाकारांना सोशल मिडीयावर सतत ट्रोल केलं जातं. त्यांच्यावर कोणतीही बंधने नसल्याने हव्या त्या कमेंट्स ते कलाकारांच्या फोटोंवर करतात. मात्र अशाच एका ट्रोलरला झापलय अभिनेता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याचा सणही सगळ्यांनी घरात बसून साजरा केला.

महेश मांजरेकर यांनीही आपल्या कुटुंबासोबत हा सण साजर करत सोशल मिडीयावर त्यांच्या परिवारासोबतचा फोटो पोस्ट केला. या फोटोवर सोशल मिडीयावर प्रचंड लाईक्स मिळाले. मात्र एका ट्रोलरने या फोटोवर चक्क शिवीगाळ करणारी कमेंट केली. ही कमेंट महेश मांजरेकर यांच्य निदर्शनास आल्यावर त्यांनी या ट्रोलरला चांगलच झापला. त्याच्या कमेंटवर महेश मांजरेकर यांनी लिहीलं की, “तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन”. 


कुणाच्याही कुटुंबासोबतच्या फोटोवर अशी कमेंट आल्यावर राग येणं सहाजीक आहे. आणि म्हणूनच महेश मांजरेकर यांनी या ट्रोलरला धमकी दिली. इतक्या मोठ्या कलाकाराच्या फोटोवर अशी शिवीगाळ करणार कमेंट करणं या ट्रोलरला चांगलचं महागात पडलय. मात्र त्याच्या या मूर्खपणाला महेश मांजरेकर यांनी योग्य उत्तर दिलय. 

या ट्रोलर्सचं काय अस्तित्व असतं का? तर मुळात फेक अकाउंट काढून निवांत वेळ असणाऱ्या या ट्रोलर्सवर आळा घालणं गरजेचं आहे.   

 

Recommended

Loading...
Share