पाहा Video : प्रार्थना बेहेरेचा तिच्या बाबांसोबतचा हा गोंडस व्हिडीओ पाहिलात का ? कुटुंबासोबत असा घालवतेय वेळ 

By  
on  

कोरोना व्हायरसच्या संकटापासून बचाव करण्यासाठी घरातच बसण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीही घरात बसून आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. 

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सुद्धा तिच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. यादरम्यान प्रार्थनाने नुकताच सोशल मिडीयावर पोस्ट केलेला व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओत प्रार्थना आणि तिचे बाबा पाहायला मिळत आहेत. प्रार्थनाचे बाबा तिची तेल मालिश म्हणजेच चंपी करत आहेत. एवढच नाही तर प्रार्थना आणि तिचे बाबा ‘सर जो तेरा चकराये’ हे गाणं गात आहेत. बाबांकडून तेल मालिश करून घेतानाचा आनंद प्रार्थनाच्या चेहऱ्यावर झळकतोय. शिवाय प्रार्थनाचा पाळीव कुत्राही या व्हिडीओत आहे. बऱ्याच कलाकारांनीही प्रार्थनाच्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. प्रार्थनाचा बाबांसोबतचा हा चंपी टाईम सोशल मिडीयावर चांगलाच गाजतोय. 


अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हा व्हिडीओ पाहून कमेंट करते की, “अगं अशक्य गोड”. अभिनेता भूषण प्रधान हा व्हिडीओ पाहून म्हणतो, “काका कमाल”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy me ..... . .

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

एकूणच कलाकार मंडळींनाही त्यांच्या कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्याची संधी या निमित्ताने मिळालीय. आणि ही कलाकार मंडळी त्याचा पुरेपुर वापर आणि सुदपयोग करत आहेत. 

Recommended

Loading...
Share