हे अभिनेता म्हणत आहेत की, “कोरोना नंतर लवकरच भेटू “

By  
on  

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त बहुतांश मराठी कलाकार सोशल मिडीयावर शुभेच्छा देत आहेत. काही रंगमंचावरील जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत तर काही नाटकातील काही भागाचा व्हिडीओ पोस्ट करून. 
प्रसिद्ध अभिनेता शरद पोंक्षे यांनीही या निमित्ताने जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘हिमालयाची सावली’ या त्यांच्या नाटकातील झलक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये शरद पोंक्षे म्हणतात की, “जागतीक रंगभूमिदिनाच्या शुभेच्छा.कोरोना नंतर लवकरच भेटू”

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सध्या सगळ्या प्रकारचं चित्रीकरण, कार्यक्रम, नाटक बंद आहेत. त्यामुळे कोरोनाचं संकट नष्ट झाल्यावर पुन्हा नव्या उमेदीने नाटकाच्या निमित्ताने भेटू असं शरद पोंक्षे यांचं या पोस्टमधून म्हणणं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe) on

कर्करोगा सारख्या मोठ्या आजारातून बरे होऊन शरद पोंक्षे यांनी ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून कमबॅक केला. शिवया ‘अग्निहोत्र’ ही मालिकाही ते करत आहेत. 
 

Recommended

Loading...
Share