घरात बसून ही अभिनेत्री जोपासतेय हा छंद,  नेटकऱ्यांनी केलं कौतुक 

By  
on  

सध्या लॉकडाउनच्या काळात घरात असल्याने विविध छंद जोपासण्याची संधीही मिळाली आहे. आपल्यातली प्रतिभा जाणून घेण्याचा हा काळ आहे. यातच काही कलाकारांनाही त्यांच्यातलं टॅलेंट ,छंद जोपासण्याची संधी मिळाली आहे. आणि म्हणूनच सोशल मिडीयावर कलाकार कविता, गाणी आणि विविध फोटो, व्हिडीओच्या माध्यमातून समोर येत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Getting out my bathroom singing skills!

A post shared by Bhagyashree Limaye (@bhagyashreelimaye) on

'घाडगे एन्ड सून' या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री भाग्यश्री लिमयेलाही तिच्यातलं अभिनया व्यतिरिक्त असलेलं टॅलेंट सापडलं. ते टॅलेंट आहे गायनाचं. भाग्यश्रीने नुकतच तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत भाग्यश्री मईया मईया हे गुरु सिनेमातील गाणं गातेय. हे गाणं भाग्यश्रीने अप्रतीम गायलं असून नेटकऱ्यांनी भाग्यश्रीचं कौतुक केलं आहे. या पोस्टमध्ये भाग्यश्री म्हणते की, “मईया मईया, माझ्या बाथरुम सिंगिंगचं कौशल्य बाहरे पडतय”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

♥️ @saneshashank

A post shared by Bhagyashree Limaye (@bhagyashreelimaye) on

 
सोशल मिडीयावर बरेच कलाकार अशा पद्धतिने त्यांचा छंद जोपासताना दिसत आहेत. शिवाय लोकांना कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आणि घराबाहेर पडून नका असं आवाहनही कलाकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून करत आहेत. 

 

Recommended

Loading...
Share