‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील शनायाचा गॅरी आणि राधिकाचा गुरुनाथ म्हणजेच सर्वांचा लाडका अभिनेता अभिजीत खांडकेकर याच्या गाडीला रविवारी अपघात झाला आणि या अपघातातून तो थोडक्यात बचावल्याचे वृत्त आहे. सुदैवाने त्याला कोणतीच दुखापत झाली नाही.
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना अभिजीतने घडलेला अपघाताचे वर्णन केले. तो माझ्या नव-याची बायको मालिकेच्या शूटींगसाठी जात असताना मीरा भाईंदर पुलावर हा अपघात घडला. त्याच्या कारसमोरील ट्रक धातूचे मोठमोठे पाईप वाहून नेत होते. त्यातील एक पाईप त्याच्या कारच्या दिशेने घरंगळत आले. कारची समोरील काच पूर्णपणे तुटली आणि तो पाईप पुलाखाली पडला.त्याने त्याच्या कारचे फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते.