घरात बसून ही अभिनेत्री करतेय आराम, फोटो पाहाल तर व्हाल घायाळ

By  
on  

मनोरंजन विश्वातील कलाकारांना लॉकडाउनमुळे मोठा ब्रेक मिळाला आहे. नेहमीच सेटवर शुटिंगमध्ये व्यस्त असणारे कलाकार यानिमित्ताने घरात बसून आराम करत आहेत. या निमित्ताने त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. शिवाय सरकारच्या सुचनांचे ते पालनही करत आहेत. 

अभिनेत्री इशा केसकरचा क्वारंटाईन कसा सुरु आहे हे ती तिच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगतेय. नुकताच तिने बॉयफ्रेंड रिशी सक्सेना सोबतचा फोटोही पोस्ट केला होता. सोशल मिडीयावर त्या फोटोंची प्रचंड चर्चा झाली. त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी तिने पोस्ट केलेले फोटोंवरही लाईक्सचा वर्षाव झालाय. सध्या इशा घरी आराम करतेय. त्यामुळे सोशल मिडीयावर ती बरीच एक्टिव्ह आहे. नुकतेच तिने आणखी काही फोटो पोस्ट केलेत. इशाच्या फोटोंमधील अदांनी नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे. या फोटोंवरही कमेंट्स, लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

सध्या घरात बसून बहुतांश लोकं सोशल मिडीयावर प्रचंड एक्टिव्ह झाले आहेत. शिवाय कलाकार मंडळीही दररोज सोशल मिडीयावर काहीना काही पोस्ट करताना दिसत आहेत. 
 

Recommended

Loading...
Share