By  
on  

 पाहा Video : या संकटातून बाहरे पडल्यावर सकारात्मक बदलही घडतील – सोनाली कुलकर्णी 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर सध्या भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र सध्या या सगळ्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोनाने बघण्याची गरज असल्याचं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणतेय. सोनालीने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

या व्हिडीओत सोनाली म्हणते की, “या सगळ्या परिस्थितीत आपण सगळे एकत्र आहोत. कुठल्याही देशात, कुठल्याही प्रांतात, कुठल्याही भाषेचे, कुठल्याही जातीचे, कुठल्याही रंगाचे, कुठल्याही वयाचे आणि कुठल्याही प्रदेशाचे असलात तरी आपण सगळे या एकमेव गोष्टीतून जात आहोत. ”


याविषयी बोलत असताना हे संकट संपल्यानंतर येणारा काळ कसा असेल याविषयी बोलताना सोनाली म्हणते की, “या नकारात्मक परिस्थितीतून जेव्हा आपण बाहेर पडू, या संकटावर मात करून जेव्हा बाहेर पडू तेव्हा निश्चितच काही सकारात्मक बदल देखील घडतील असा माझा विश्वास आहे. आणि कदाचीत काही गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनही बदलेल.अनेक गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन सकारात्मक होईल.”

येणाऱ्या काळात सकारात्मक दृष्टीकोनाला सामोरं जाण्यासाठी सोनाली उत्सुक असल्याचही तिने या व्हिडीओच्या माध्यमातून सांगीतलं. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive